पुणे (प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आज पुण्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्या दहा हजाराच्या वर पोहोचली आहे. तर २ जणांचा झाला मृत्यू झाला आहे.मृत्यू दर कमी असला तरी संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.
पुण्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली की, पुढच्या आठवड्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊ व त्यानंतर वीकेंड लॉकडाऊनबाबत (Weekend Lockdown) चा पुढील शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल.
सक्रिय रुग्ण संख्या ५० हजारावर
सध्या पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या ५० हजारावर पोहोचली आहे. यावरून पुण्यात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.अजितदादा पवार यांनी पुढे माहिती देतांना सांगितलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमावलीबाबत जो निर्णय घेतला आहे. तोच निर्णय सध्या लागू आहे. त्याचं तंतोतंत पालन करणं हे आमचं धोरण आहे. या अनुषंगानं विविध प्रकारची चर्चा झाली. पण या आठवड्यात तरी कुठलाही बदल करु नये असं ठरलं आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात काय परिस्थिती राहील हे पाहून पुढील शुक्रवारच्या बैठकमध्ये निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.