राज्यात आज मंगळवार पासून थंडीची लाट (Cold Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे. तीव्र थंडीची लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे, गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्र गारठला असून पुढील काही दिवसात अजून कडाक्याची थंडी पडण्याची श्यक्यात आहे.पुढील 2 दिवसांत वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये,मध्य आणि पूर्व भारत व महाराष्ट्रात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही (राजस्थान वगळता),त्यानंतर वायव्य भारतात किमान तापमानात 3-5°C ने वाढ.मध्य व पूर्व भारत तसेच महाराष्ट्रात 2-4°C ने वाढ अपेक्षीत आहे.
20 Dec,पुढील 2 दिवसांत वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये,मध्य आणि पूर्व भारत व महाराष्ट्रात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही (राजस्थान वगळता).
त्यानंतर वायव्य भारतात किमान तापमानात 3-5°C ने वाढ.मध्य व पूर्व भारत तसेच महाराष्ट्रात 2-4°C ने वाढ अपेक्षीत
IMD pic.twitter.com/lraFVLAsIP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 20, 2021
भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट आणि तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम राहील आणि त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे,
महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
20 Dec: Cold Wave Warnings for Next 24 hrs
Cold Wave to severe cold wave conditions in a few pockets very likely over Punjab,Haryana,
Chandigarh,Delhi,Rajasthan & Cold wave conditions in isolat places over J&K,Ladakh,Gilgit-Baltistan & Muzaffarabad,HP,Uttarakhand,UP
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 20, 2021