जळगाव : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) एकमेकांच्या विरोधात लढत आहे. सध्या प्रचार सभांनी जोर धरला असून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. अशात शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांची सभा होती. यावेळी त्यांनी थेट आव्हान देत एकनाथ खडसेंना डिवचलं. ”३० वर्ष आमदार राहिलेल्या लोकांना माझं आव्हान आहे की, त्यांनी माझ्या मतदारसंघात धरणगावला येऊन पाहावं. मी काय विकास केला हे त्यांना दिसेल. धरणगावला हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीतर राजीनामा देऊन टाकेन”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. बोदवडच्या रस्त्यांच्या उल्लेख करत त्यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. अरे हे काय रस्त्ते आहेत का? असा सवाल करत महाराष्ट्राला ज्ञान शिकवता, आधी बोदवडचे रस्ते करा, असं आव्हान त्यांनी खडसेंना दिले.
शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्राचारात विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, अशी टीका पाटलांनी खडसेंवर केली आहे. दरम्यान हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी केल्याबद्दल गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

