महाराष्ट्र राज्यात पुन्हा ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी नवे ८ रुग्ण आढळून आल्याने राज्यात ओमिक्रॉनमुळे चिंता वाढताना दिसत आहे. आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.दरम्यान देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
काल नव्याने आढळून आलेल्या ८ रुग्णांमध्ये ३ महिला असून ५ पुरुष आहेत. तसेच ३ रुग्ण लक्षणे विरहित असून ५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.
8 more patients found infected with #Omicron in the state. Out of these 7 are from Mumbai & 1 patient is from Vasai Virar. Till date, a total of 28 patients infected with Omicron have been reported in the state. Out of these, 9 have been discharged after negative RT-PCR test. pic.twitter.com/AptIVHMk8h
— ANI (@ANI) December 14, 2021
चीनने यापूर्वीच सोमवारी उत्तरेकडील तियानजिन शहरात ओमिक्रॉन स्ट्रेनची आढळल्याची पुष्टी केली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुद्धा ओमिक्रॉन संसर्गामुळे देशातील पहिल्या मृत्यूची पबातमी दिली होती. ओमिक्रॉन स्ट्रेनचा प्रसार “आश्चर्यकारक दराने” होत आहे आणि लंडनमध्ये सुमारे ४० टक्के संसर्ग होतो आहे.
दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातदिल्ली सरकार देखील निर्बंध घालू शकते असे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

