मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. करिनासोबत तिची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री अमृता अरोराही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सोमवारी या दोन्ही अभिनेत्रींचा चाचणी अहवाल आला असून, त्यात दोघी पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
नुकतीच करिनाने तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी केली होती. या पार्टीत करीनासोबत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा, पूनम दमानिया, मसाबा गुप्ता आणि अमृता अरोरा होत्या.
करीना आणि अमृता यांनी त्यांच्या मित्रांसोबत कोरोना नियमांचे उल्लंघन करत पार्टी केली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही आले आहेत. पण, आता दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCR चाचणी घेण्यास सांगितले आहे.
बीएमसी आता त्या लोकांचा मागोवा घेत आहे, त्यांनी अभिनेत्रींसोबत पार्टी केली होती का किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आले होते. अलीकडच्या काळात करीना तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली. ज्याचे फोटोही करिनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, अद्याप अभिनेत्रींकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

