जळगाव – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनचालकांना आणखी महागात पडणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायदा २०१९ ची अंमलबजावणी करण्यात आलेली असून यात दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली होती.
नवीन नियम लागू वाहतुकीचे नवीन नियम राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. त्या अनुशंगाने जिल्ह्यात सोमवारपासून वाहनचालक, मालकांनी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंडाची रक्कम सेट केली आहेयात महत्त्वाचे म्हणजे आता हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्याचा परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित होऊ शकतो. तसेच प्रवासी वाहनांमध्ये १२ वर्षांखालील बालकांना पुरेशी बैठक व्यवस्था देणे सक्तीचे केले आहे.
५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे दंड निर्धारित करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ऑनलाइन दंडाच्या मशिनमध्ये सर्व नियम व दंड अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून वाहन चालवताना नियमांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. पहिला दंड भरल्यानंतर पुन्हा तीच चूक करणाऱ्यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे.