नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टमुळे जागतिक बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. आज, 10 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचे दरही वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी 0.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.
देशात लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढत असून त्याचाच परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. सोने आणि चांदी दोन्ही वरच्या पातळीवर ट्रेड करताना दिसत आहेत.
सोन्याचा आजचा भाव
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे फेब्रुवारीचे फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी वाढून 48,008 रुपये प्रति ग्रॅमवर दिसत आहेत. गेल्या वर्षी सोन्याने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता आणि यावेळी सोने ऐतिहासिक पातळीपासून 8000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीचा आजचा भाव
चांदीचा धातू किंवा चांदीच्या किमती आज 0.07 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि एमसीएक्सवर त्याचे मार्च फ्युचर्स 60,839 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.