जळगाव प्रतिनिधी | जीएमसीत ४९ जागा भरण्यात येणार आहे असून, यासाठी शुक्रवारी मुलाखती घेण्यात येणार आहे. यात सहायक प्राध्यापक पदाच्या १९, वरिष्ठ निवासी डॉक्टर १८ तर १२ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जीएमसीत विविध विभागात रिक्त असलेल्या तीन प्रकारातील जागांसाठी आरक्षण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून रिक्त जागांचा तपशील तयार करून त्यानंतर या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. या अंतर्गत
पदांचा तपशील
यात सहायक प्राध्यापक पदांमध्ये शरीरशास्त्र २, जीव रसायनशास्त्र १, शरीरविकृतीशास्त्र १, सूक्ष्मजीवशास्त्र २, त्वचा व गुप्तरोग १, शल्यचिकित्साशास्त्र १, औषध वैद्यकशास्त्र ३, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र १, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र ३, क्ष-किरणशास्त्र १, बधिरीकरणंशास्त्र २ अशी १९ पदे भरली जाणार आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये त्वचा व गुप्तरोग, मनोविकृतशास्त्र, बालरोगशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्र शल्य चिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात प्रत्येकी १, बधिरीकरणशास्त्र २, क्ष-किरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र विभागात प्रत्येकी ३ तर औषध वैद्यकशास्त्र विभागात ४ अशा एकूण १८ जागा भरण्यात येणार आहे. १२ वैद्यकीय अधिकारी देखील घेतले जाणार असून निवड झालेल्यांच्या मुलाखती हाेणार आहे.