जळगाव,(प्रतिनिधी)- मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणू संक्रमण च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिका मध्ये ओमीक्रोन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्या मुळे संक्रमण चा नवीन धोका निर्माण झाला आहे. मुंबई सह महाराष्ट्र मध्ये ही ओमीक्रोन ची प्रजातीची काही प्रकरणे आढळून आल्याने ओमीक्रोन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये व राहिवाशी मध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणतेही सामाजिक कार्यक्रम व जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे असे शासनाचे म्हणणे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने देखील या बाबत स्पष्टता केली आहे. या विषाणू बाबत महाराष्ट्र शासनाने क केंद्र शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात गर्दी करू नये तथा सार्वजनिक कार्यक्रम वर निर्बध लावण्यात आले आहे.
तरी महोदय या अनुषंगाने विनंती करण्यात येते की, जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थी यांच्या आरोग्य च्या दृष्टीने व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या देखील आरोग्य च्या दृष्टीने केंद्र सरकारने 3 टप्पातील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 31 मार्च 2021 पर्यत वाढवून देण्यात आली आहे.तसेच ओमीक्रोन चे संकट आपल्या समोर येऊन ठेपले आहे. लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानावर दोन वेळा यावे लागते आहे. मोलमजुरी करणारा कष्टकरी कामगार शेतमजूर महिला वर्ग यांना महिन्यातून दोन वेळा स्वस्त धान्य दुकानावर यावे लागते त्यासाठी आपला रोज बुडवाव लागतो आर्थिक नुकसान होते. त्यातच स्वस्त धान्य दुकानावर गर्दी असते. बऱ्याच वेळा e-pos मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटत नाही. फार अडचण निर्माण होते. महिन्यातील दोन टप्पे करण्याऐवजी एकाच टप्पात नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ जनतेला द्यावा जेणे करून नागरिकांना देखील वेळ मिळतो तसेच दुकान दार यांना देखील वाटपासाठी वेळ मिळतो.
शासनाने नियमित व PMGKY चे स्वस्त धान्य दुकानात एकाच वेळी पोहच करावे. यामुळे जनता – प्रशासन – दुकानदार यांचा वेळ वाचेल व ओमीक्रोन सोबत आपल्याला लढता येईल. तरी महोदय आपण आमच्या मागण्या चा विचार करून पुढीलप्रमाणे मागण्या मान्य कराव्यात…
१) जळगाव जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात एकाच वेळी नियमित व PMGKY चे पोहच करण्यात यावे.
२) प्राधान्य कुटुंबातील व अंत्योदय योजनीतील लाभार्थी यांना एका महिन्यात 2 वेळा बोलविण्यापेक्षा एकाच वेळी दोन्ही धान्य उपलब्ध करून द्यावे.
३) एकाच वेळी स्वस्त धान्य दुकानदार यांना लाभार्थींची बायोमेट्रिक करण्याची मुभा देण्यात यावी….अश्या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय निकम यांनी सादर केले आहे.