यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पाथराळे येथील ५२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. गोपाळ सोनु घिवर (वय-५२) असे मयताचे नाव असून ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही समजू शकले नसून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाथराळे येथील गोपाळ घिवर हे पत्नी, मुलगा व सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात. बुधवार ८ डिसेंबर रोजी पत्नी, मुलगा आणि सुन बाहेरगावी गेले होते. त्यामुळे गोपाळ घिवर हे घरात एकटेच होते. सायंकाळी ४ वाजेच्या वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या त्याच्या घरी आला. परंतू दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने घरात जावून पाहिले असता काकाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण उद्याप अस्पष्ट आहे.
शेजारच्याच्या मदतीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी मयत घोषीत केले. सायंकाळी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाचपोळ करीत आहे.