नवी दिल्ली : भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय सैन्याच्या तिन्ही दालांचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे.
लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून विद्यमान लष्करप्रमुख म्हणून बिपीन रावत यांनी जबाबदारी पार पडली आहे. देशाचे पहिले ‘सीडीएस’ बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. दरम्यान आज ते आपल्या कुटूंबासह भारतीय संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून निघाले होते. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनडूमधील कुन्नूर परिसरात आले असता खाली कोसळले.
तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे त्या ठिकाणी परिसरातील गावातील लोकांनी येऊन तत्काळ बचावकार्य सुरु केले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये होते इतके लोक?
सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा, सतपाल