जळगाव,(प्रतिनिधी) – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र पाटील यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव संस्थेने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत. डॉ. जेतेंद्र पाटील यांना आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय आणि १२६ राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहेत. पुरस्कार वितरण प्रसंगी आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री तथा जेडीसीसी बँक चेअरमन गुलाबराव देवकर,पी ए पाटील ( मराठा कुणबी वधु वर परिचय ग्रुपचे संस्थापक,अध्यक्ष ),सौ. संदीपा ज्ञानेश्वर वाघ, राजनंदनी फाउंडेशन अध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जितेंद्र पाटील यांच्या विषयी थोडंसं….
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा
देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्या आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे व्यक्ती म्हणजे लोकप्रिय जनसेवक जितेंद्र पाटील होय.
कर्तृत्ववान माणसं हि ध्येय पेरीत असतात ज्याप्रमाणे कोणतेही संकट समयी जसं गरुडाला गगनगिरी शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे
आपणही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली आहात.विविधांगी लोकोपयोगी कामे केलेले आहात
कोरोनाव्हायरस महा मारीच्या संसर्ग आजारामुळे देशातील जनता भयभीत झाली आहे अशा संकटसमयी ते
रक्तदान आरोग्य शिबिर जनजागृती रुग्णवाहिका सेवा विविध उपक्रम हाती घेऊन प्रशासनीय उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे धुणी-भांडी करणारे हात मजूर स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे. व आरोग्य तपासणी स्वयंस्फूर्तीने निरलस सेवा नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन कोरोना च्या आपत्तीमुळे बिकट परिस्थितीमध्ये
गरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केले आहे.