पाचोरा प्रतिनिधी : भारतात कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर दहशत पसरली आहे. ओमायक्रॉनचा फैलाव होऊ नये म्हणून पाचोरा शहरात सुरू असलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी लोकहितार्थ मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी केली आहे.
देशात आणि राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता पाचोरा शहरात व तालुक्यात कोठे ही मोठी गर्दी जमा होणार नाही याची दक्षता पोलिस, महसूल प्रशासनाने घेण्याची वेळ आली आहे. त्यातच पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होण्यास शासकीय परवानगी दिलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून त्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशीही मागणी किशोर रायसाकडा यांनी केली आहे.