रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील विटवा येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आकाश उर्फ (रवी) सुरेश वानखेडे (वय २२, रा.विटवे,ता.रावेर) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
विटवा येथील रहिवासी आकाश वानखेडे हा शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मात्र, त्याने टोकाचे पाऊल का उचलले? ते स्पष्ट झाले नाही. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.