जळगाव,(प्रतिनिधी)- शासनाचे आदेश व नियमावली संपूर्ण धाब्यावर बसवून जळगाव शहरातील जी एस ग्राऊंड या ठिकाणी सुरु असलेल्या आनंद मेळ्या मध्ये व बाहेर फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. साधारण हजारो नागरिक या ठिकाणी येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर वाहतूक साठी फार समस्या निर्माण होत आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या बऱ्याच नागरिकाच्या तोंड ला माक्स राहत नाही.. सोशल डिस्टसिंग नाही….. यामुळे जळगाव शहरात संक्रमण होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही या सर्वस्वी आनंद मेळा त्याला परवानगी देणारे अधिकारी असतील….तरी जळगाव शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करता हा आनंद मेळा बंद करण्यात यावा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालकावर कार्यवाही करण्यात यावी…असे झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेशाध्यक्ष विजय निकम यांनी आंदोलन चा इशारा दिला आहे.
मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणू संक्रमण च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिका मध्ये ओमीक्रोन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्या मुळे संक्रमण चा नवीन धोका निर्माण झाला आहे. मुंबई सह महाराष्ट्र मध्ये ही ओमीक्रोन ची प्रजातीची काही प्रकरणे आढळून आल्याने ओमीक्रोन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये व राहिवाशी मध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणतेही सामाजिक कार्यक्रम व जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे असे शासनाचे म्हणणे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने देखील या बाबत स्पष्टता केली आहे. या विषाणू बाबत महाराष्ट्र शासनाने क केंद्र शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात गर्दी करू नये तथा सार्वजनिक कार्यक्रम वर निर्बध लावण्यात आले आहे. माक्स वापरा व कोरोना प्रतिबंध लसीकरण केलेल्या नागरिकांना काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. असे अनेक नियम शासनाने तयार केले आहे.