जळगाव : भारत सरकारच्या ‘राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’ कोलकत्ता अंतर्गत महाराष्ट्र राज्य नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्र राज्य नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादीच्या रिता भूपेंद्र बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच अभिनंदन केले.
दरम्यान, समितीतील शासनाकडून तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाचे अध्यक्ष यांनी नामनिर्देशनाने नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाल तीन वर्ष इतका राहील. ग्रंथालय संचालकांनी प्रतिष्ठानाकडून राबविण्यात येणा-या अर्थसहाय्याच्या समान निधी व इतर मदत योजनांसाठी मंजूर निधीचा प्रारुप आराखडा सादर करणे व त्यास अंतिम मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव नियमानुसार तपासून समितीस सादर करणे बंधनकारक राहील.
कधी झाली स्थापना?
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता, या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने १९७२ साली झाली. देशातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा सार्वत्रिक विकास करणे, हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. राज्यांमध्ये व संघराज्यांमध्ये ग्रंथालय सेवा प्रभावीपणे राबवून ती वृद्धिंगत करण्यासाठी प्रतिष्ठान, राज्यांना ५०९५० या प्रमाणात अनुरुप अनुदान देते.