जळगाव : आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. राज्यात ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी काही नियम पुन्हा लागू आहे. अशात करोनाच्या नियमांचं उल्लंघन करणार्यांविरोधात महापालिकेने कारवाईची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी जळगावातील १० दुकानदारांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहे.
महापालिकेच्या कारवाईत मॉल, दुकाने, हॉटेल्स व इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे, ग्राहक व दुकानदारांनी लसीकरण न करणे आदी मुद्द्यांवरून दंड ठोठावण्यात आला आहे.
बळीरामपेठेतील मनोहर साडीयॉ, श्री.जी. साडीयॉ, ओंकारेश्वर मंदीर समोरली वसंत सुपर शॉप, बाहिणाबाई उद्यानसमोरील नवजीवन प्लस, टॉवर चौकातील बॉम्बे सेल्स, नवीपेठेतील मनोहर शुज सेंटर, राजेश कलेक्शन, बळीराम पेठेतील नितीन फुट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स आणि आकाश एजन्सी अशा १० दुकानदारांना एकूण १ लाख १० हजार रूपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.दरम्यान, दुकानदारांनी २४ तासाच्या आत महापालिकेत खुलासा न दिल्यास आकारलेली दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.