जळगाव प्रतिनिधी | शिरसोली ते जळगाव दरम्यान दापाेरा शिवारात रेल्वेतून पडून सुमारे ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाजवळ काळ्या रंगाचा बूट पोलिसांना आढळून आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला. बुधवारी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक सौरभ कुमार यांनी तालुका पोलिसांना मृतदेह आढळल्याबाबत कळविले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे, सतीश हळनोर, जितंेद्र गवंदे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तपास अनिल फेगडे हे करीत आहेत.