बोदवड :-(सचिन पाटील)- शहरातील नगरपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजले असून आजपासून दिनांक 7 पर्यंत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. हि निवडणूक राष्ट्रवादी व शिवसेना या दोन राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. एकीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल आमदार तर दुसरीकडे भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार एकनाथ खडसे या दोघा नेत्यांना राजकीय रणधुमाळीत सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
दिनांक 23 डिसेंबर रोजी शहरातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहरातील 17 प्रभागांपैकी 9 प्रभागांत महिला राखीव आरक्षण सोडत झाल्याने शहरातील प्रस्थापित नगरसेवक तथा माजी सरपंच , उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य , नगरसेवक यांचा हिरमोड होऊन धक्का बसला होता. परंतु , यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणेला हाताशी धरुन प्रारुप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला.
शहरात सरपंच , उपसरपंच अशी पदे भोगलेल्या प्रस्थापित राजकीय व्यक्तींना भावी नगराध्यक्ष पदाचे डोहाळे लागल्याने दुसर्या प्रभागांत बेडूक उड्या मारण्याच्या बेतात होते. याद्यांत हरकती घेऊनही 10 टक्केच बदल होइल असा दृढ विश्वास त्यांना होता. म्हणुन मतदार हरकतींच्या बॅगा भरुन नगरपंचायतीत तर प्रस्थापित यंत्रणेवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात होते.
या सर्व प्रकाराने शहरात खळबळ उडालेली असतांना शहरातील इच्छुक उमेदवारांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्याकडे धाव घेत सदरील प्रकाराची कैफियत मांडली. त्यात आमदार पाटिल यांनी इच्छुक उमेदवारांना धिर देत हा पिक्चर जुना आहे , मुक्ताईनगरात असे प्रकार घडतात. तुम्ही चिंता करु नका ! इकडे मि बसलेलो आहे असा धिर उपस्थितांना देत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेत सदरील घोळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी शुद्धिकरण 100 % होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर काही प्रमाणात समाधानी झाले.
दिनांक 29 रोजी अधिप्रमाणित यादी प्रसिद्ध झाल्याने विरोधकांच्या झोपा उडाल्या. 90% टक्के यादी दुरुस्त झाल्याने प्रस्थापितांना हादरे बसले. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीची बोगस यादी दुरुस्त झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या हालचालीने विरोधक हैराण झाल्याने तंबूत घबराट निर्माण झाली आहे. याद्यांच्या शुद्धिकरणानंतर शहरातील मतदार समाधानी असुन घोळ करणाऱ्यांची निव्वळ गोची झाली आहे. तेलही गेले तूप ही गेले हाती धुपटणे ही आले नाही अशी गोची सद्ध्या प्रस्थापित पुढाऱ्यांची झाली आहे.