जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीत एका २८ वर्षीय तरुणाने पोटाच्या आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. राजेश शांताराम पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे.
राजेश पाटील हे रामेश्वर कॉलनीत आई-वडील, पत्नी, मुलासह राहत होते़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा आजार जडला होता. हा त्रास वाढल्यामुळे ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६.४० वाजेच्या सुमारास कुटुंबीयांना जाग आल्यानंतर हा प्रकार समोर आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सीएमओ डॉ.नीता पवार यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास अतुल पाटील करीत आहेत.