मुंबई,(प्रतिनिधी) – राज्यातील सर्वधार्मिय मंदिरं ७ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याचे नियम पाळून मंदिरे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून याबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. तरी सावध राहावे लागेल.
चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2021