चाळीसगाव प्रतिनिधी | सीआरपीएफमध्ये कार्यरत जवान चंद्रदीप रमेश आव्हाड (३२, रा. पंचशिल नगर, चाळीसगाव ) यांचे अल्पशा आजाराने दि. २२ सप्टेंबर रोजी निधन झाले.
चंद्रदीप रमेश आव्हाड हे छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नियुक्त होते. काही दिवसांपूर्वी सेवेत असतानाच ते आजारी पडले. त्या आजाराचे रूपांतर कावीळ आजारामध्ये झाले. कुटुंबियांनी त्यांना घरी बोलावून नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर बुधवारी दि. २२ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली.