जालना,(प्रतिनिधी)-बस चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात प्रवासी असलेली एसटी बस पडल्याची थरारक घटना जालना-परतूर तालुक्यातील सृष्टी गावानजीकच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. पुलाचा अंदाज न आल्याने बस नदीत पडली.मात्र बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यात अडथळा येत असतांना गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून या बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
अंधार असल्याने मदत कार्यात अडचण….
नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बस पडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासन,गावकरी तातडीने घटनासथळी पोहचले. पोलीस प्रशासन आणि गावाकऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून सर्व प्रवाशांना बसमधून पाण्याबाहेर बाहेर काढलं. रात्रीचा वेळ आणि अंधारअसल्याने मदत कार्यात अडचण येतं होती तरी देखील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.