नवी दिल्ली । आज सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे वायदे 0.6% घसरून 46,377 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी चांदीच्या किमतीतही मोठी घसरण दिसून आली, जी अलिकडच्या महिन्यांतील सर्वाधिक आहे. चांदीचे दर 1%घसरले. मागील सत्रात, सोने सपाट पातळीवर बंद झाले होते तर चांदी 1.2% वाढली होती. संपूर्ण आठवड्यात सराफा रेड झोनमध्ये ट्रेड करत आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मासिक बॉंडची खरेदी सुलभ करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये आज सोन्याचे भाव कमी झाले. स्पॉट सोने 0.3% घसरून 1,762.33 डॉलर प्रति औंसवर होते. डॉलर इंडेक्स एक महिन्याच्या उच्चांकावर बंद झाला
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, भारतात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याची विक्री 46,360 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. चांदी कालच्या व्यवहारिक किंमतीपेक्षा 1,100 रुपयांच्या वाढीसह 60,900 रुपये प्रति किलोवर विकत आहे. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोने अनुक्रमे 46,000 आणि 45,360 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. वेबसाइटनुसार, सोने चेन्नईमध्ये 44,110 रुपयांना विकले जात आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 50,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि मुंबईत 46,360 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. चेन्नईमध्ये आज सकाळी सोने 48,110 रुपयांना विकले जात आहे. कोलकाताची किंमत 48,900 रुपये आहे.