नवी दिल्ली । आज भारतीय बाजारात सोन्याचे भाव घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति 10 ग्रॅम 46,630 वर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, सप्टेंबरसाठी चांदीचा वायदा 0.71 टक्क्यांनी वाढून 60,870 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. मागील सत्रात सोने 0.7 टक्के आणि चांदी 1.2 टक्क्यांनी वाढले होते.
दरम्यान गेल्यावर्षी सोन्याचा दर 56,000 रुपये प्रति तोळावर पोहोचला होता. त्यानुसार आता सोन्याचा दर जवळपास 10000 रुपयांनी स्वस्त आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज बुधवारी सोन्याचा दर (24 कॅरेट) सोन्याचा दर 46,330 रुपये प्रति तोळावर आहे.
आजचे दर
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, बुधवारी भारतात सोने (24 कॅरेट) प्रति 10 ग्रॅम 46,330 रुपयांना विकले जात आहे. चांदी 59,800 रुपये प्रति किलोने विकली जात आहे, कालच्या ट्रेडिंग प्राईसपेक्षा 200 रुपयांनी कमी झाली आहे. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम अनुक्रमे 45,650 आणि 45,330 रुपयांना विकले जात आहे. वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 43,740 रुपयांना विकले जात आहे. दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 49,800 आणि मुंबईत 46,330 रुपयांना विकले जात आहे. चेन्नईमध्ये आज सकाळी सोने प्रति 10 ग्रॅम 47,720 रुपयांना विकले जात आहे. कोलकातासाठी किंमत प्रति 10 ग्रॅम 48,250 रुपये आहे.
गुंतवणूक करण्याची योग्य वेळ
तज्ञांच्या मते, MCX वर सोने 46800-47055 च्या दरम्यान राहू शकते. दुसरीकडे, चांदी 61000-61400 च्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. 61200 च्या उद्दिष्टासाठी 59400 च्या स्टॉप लॉससह तज्ञ 59,900 च्या जवळ चांदी खरेदी करण्याचे सुचवत आहेत. त्याचबरोबर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे.