जळगाव,(प्रतिनिधी)– येथून जवळच असलेल्या नशिराबाद उड्डाणंपुलाखाली सायंकाळी गोळीबार होऊन एक जागीच ठार झाला होता तर एक जखमी झाला होता दरम्यान या हत्येतील आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खून प्रकरणी खटल्यात जामीन मिळाल्यानंतर घरी जात असतांना वडील व मुलावर वाटेतच गोळीबार व चॉपर ने हल्ला चढवीला होता. यात मुलगा ठार तर वडील जखमी आहे.
काय आहे नेमकं प्रकरण….
भुसावळ येथील कैफ शेख जाकीर या तरुणाचा 11 ऑक्टोबर 2020 रोजी खून झाला होता. या खून प्रकरणी संशयीत धम्मप्रिय मनोहर सुरळकर हा जळगाव कारागृहात होता. आज धम्मप्रिय याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला. त्याच्या जामीनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता त्याचे वडील मनोहर सुरळकर यांनी केली. त्यानंतर दोघे पिता पुत्र भुसावळच्या दिशेने मोटार सायकलने निघाले असता नशिराबाद उड्डाणं पुलाजवळ ही घटना घडली.