जळगाव,(प्रतिनिधी)- नशिराबाद जवळ गोळीबार आणि चॉपर हल्ल्यात एक जण ठार झाला असून एक जखमी झाल्याचे वृत्त आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्याने आज हल्ला केल्याने ही घटना घडल्याचे समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी भुसावळ येथे जात असतांना नशिराबाद जवळ त्यांच्यावर गोळीबारा सह चॉपरने हल्ला करण्यात आला. यातील एक जण हा जागीच ठार झालेला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहचले आहेत.