मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात काहीशी तेजी पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोने-चांदी दरात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे.
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.23 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीतही कमकुवतता पाहायला मिळत आहे. डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 0.03 टक्क्यांनी कमी झाल्यात.
सोने-चांदी दर
आज सोनं 46,205 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. तर चांदी 59,615 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
24 कॅरेट गोल्ड रेट –
गुडरिटर्न वेबसाईटनुसार, देशातील सर्व शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. 21 सप्टेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,570 रुपये आहे. तर मुंबईत 46,120 रुपये, चेन्नईमध्ये 47,550 आणि कोलकातामध्ये 48,240 रुपये आहे.
22 कॅरेट गोल्ड रेट –
22 कॅरेट गोल्ड रेट गुडरिटर्न वेबसाईटनुसार, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,440 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 43,590 रुपये, मुंबईत 45,120 रुपये आणि कोलकातामध्ये 45,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जळगावातील सोने चांदीचे दर
दरम्यान, आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ३०० रुपयाने महागली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. आज चांदी प्रति किलो ३९० रुपयाने घसरली आहे. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात (२१सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,३६० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,०१० रुपये इतका आहे. सणासुदीत सोने चांदी स्वस्त होत असल्याने खरेदी करण्याची हि उत्तम संधी आहे.