बीड – करुणा शर्मा(मुंडे) यांच्या जामीन प्रकरणावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, अशात आज अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. मात्र न्यायालयाने जामीन प्रकरणी निकाल राखीव ठेवला असून उद्या या जामीन अर्जावरील निकाल न्यायालय देऊ शकतो.
जामीन अर्जावर सुनावणी होतं असतांना सरकारी वकिलांनी युक्तिवाद करतांना करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचे कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.तर करुणा शर्मा यांचे वकील ऍड.जयंत भाराजकर यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद केला.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळ जनक आरोप करून करुणा शर्मा मुंडे यांनी राज्यात एकच खळबळ उडवून टाकली होती. दरम्यान परळी शहरात करुणा शर्मा आल्या असता त्यावेळी त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले होते. दरम्यान त्यांच्या त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत.त्यांनीच माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली असा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता.
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी परळी पोलिसांनी करुणा शर्मा मुंडे यांना अटक केली होती त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या ड्रायव्हरलाही एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असता त्यावर आज सुनावणी होऊन न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.