जामनेर : तालुक्यातील जांभूळ शिवारात तलावाजवळ खेळत असतांना पाण्यात बुडून चुलत बहिण- भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पायल नितिन जोशी (७) व रूद्र गोरख जोशी( ५) अशी मृत बहीण- भावंडाची नावे आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.
जांभूळ शिवारातील शेतात गोरख जोशी यांचा परिवार राहतो. सकाळी आई वडील हे बाहेरगावी गेले होते. खेळता – खेळता दुपारी ही मुले पाण्यात बुडाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याही बाब लक्षात आली. घटनास्थळी मदतकार्य करून दोन्ही मुलांना पहूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी सुर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी या मुलांना मृत घोषित केले.