जामनेर,(प्रतिनिधी) – तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या जांभूळ येथील आई-वडील बाहेरगावी गेले असतांना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
जांभूळ येथे नितीन एकनाथ जोशी आणि गोरख एकनाथ जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात. आज तालुक्यातील शेंगोळा येथे वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी हे त्यांच्या पत्नीसह गेले असतांना त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र हे दोघे खेळत खेळत दुपारच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या सुभाष रामदास शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत पोहचले आणि त्यांचा या केटीवेअर मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.