चाळीसगाव,(प्रतिनिधी)- तालुक्यातील वाघळी गावातील 13-14 वर्षीय दोन मुलं नदीत पोहण्यासाठी गेले असता या दोघं मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.19 सप्टेंबर रोजी घडल्याचे समजते.
साहिल शरीफ शहा (वय १४) व आयान शरीफ शहा (वय १७) या दोघे भाऊ आहेत. नदीत पोहत असताना दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. यातून त्यांना बाहेर निघता आले नाही. दरम्यान दोघांचा बुडून मृत्यू झाला. शोध घेतल्यावर आयानचा मृतदेह मिळून आला मात्र साहिल अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव तहसीलदार व पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असल्याची माहिती वाघळी पोलीस पाटील यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना दिली आहे.