मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असतांना आता किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचे म्हटले असून मला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, ठाकरे सरकारची दडपशाही, माझा घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री आदेश…
मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेस. असं ट्विट केले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1439528417586679811?s=19