चंदीगड- पंजाब मुख्यमंत्रीपदा करिता काँग्रेसकडून चाचपणी सुरु असतांनाच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या हायकमांडला थेट चॅलेंज केल्याचं समोर आलं आहे.
पंजाबला नवा मुख्यमंत्री द्यायचाच असेल तर तो माझ्या गटातील द्या,नाही तर बहुमत चाचणीसाठी तयार राहा, असा इशाराच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हायकमांडला दिला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.