जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या पाच सहा दिवसापासून कमी झालेल्या पाऊस पुन्हा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून जळगाव जिल्ह्याला देखील ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.राज्यात पुढचे चार, पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असून याबाबत आज IMD ने ट्विट करून कळविले आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता pic.twitter.com/hTFRMANoKb
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 18, 2021
उत्तर-पश्र्चिम मध्यप्रदेश,पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासात क्षीण,बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या १२ तासात ओरीसाकडे सरकेल व पुढच्या २,३ दिवसात पश्र्चिम-उत्तर:पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/JYmdPo98tJ भेट द्या. pic.twitter.com/yUiUzkbwwi
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 18, 2021