नवी दिल्ली : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तुमच्याकडे घर विकत घेण्यासाठी पूर्ण रक्कम नाहीये तर गृहकर्ज हा सर्वात सोपा उपाय आहे. मात्र गृहकर्ज घेण्यापूर्वी गृहकर्जाशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घेणे गरजेचे आहेत.
गृहकर्ज घेण्याआधी त्यासंबंधीची माहिती जरूर मिळवा. तुम्ही ज्या परिसरात घर घेणार आहात, तिथे कोणती बँक होम लोन देते याची माहिती करुन घ्या. तसेच गृहकर्जाशी निगडीत अनेक सोयी सुविधा बँका देत असतात. त्या सर्व बँकांबद्दल माहिती करुन घ्या. तसेच कर्ज देणारी संस्था ही खाजगी आहे की सरकारी याची चौकशी करा. त्या संस्थेचा व्याज दर, फिक्स, फ्लोटिंग तसेच फ्लेक्सी कर्जांच्या अटीही जाणून घ्या.
गृहकर्जाशी निगडीत निर्णय घाईत घेऊ नका-
गृहकर्जासाठी बँकेची निवड करताना वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्स आणि व्याज दराची तुलना नक्की करा. तुम्हाला ज्या बँकेची ऑफर योग्य वाटते त्याच बँकेची शेवटी निवड करा.
व्याज, प्रोसेसिंग फीची पडताळणी करा-
गृहकर्ज घेण्याआधी बँकेला व्याज दर, प्रोसेसिंग फी आणि किती वर्षांचा कर्जाचा काळ असणार आहे याची योग्य ती सर्व माहिती बँकेकडून घ्या. जर तुम्ही तुमच्या मनात या सर्व गोष्टींबद्दल संभ्रम आहे तर त्याबद्दल पूर्ण खात्री झाल्याशिवाय गृहकर्ज घेऊ नका. चौकशी न करता कोणत्याही बँकेकडून घेतलेले गृहकर्ज महागात पडू शकते. थोडी चौकशी केली तर तुम्हाला दुसऱ्या बँकेत कमी व्याज दरात गृहकर्ज मिळू शकते.
महत्त्वाच्या कागदपत्रांची पुर्तता-
गृहकर्जासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्र आधीच तयार ठेवा. गृहकर्जाच्या प्रोसेसिंगसाटी बँक तुमच्याकडे जे कागदपत्र आवश्यक आहेत तिच मागतील. अनेकदा लोक कागदपत्रांच्या पुर्ततेत टाळाटाळ करतात आणि त्याऐवजी एनबीएफसीमधून गृहकर्ज घेणं सोयीस्कर समजतात.
जर तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी दोन्हीकडून जाणाऱ्या हफ्त्यांची तुलना केली तर तुम्हाला कळेल की, बँकेकडून गृहकर्ज घेणं जास्त सोयीस्कर आहे. एनबीएफसीमधून गृहकर्ज घेतलं तर कमी कागजपत्र द्यावी लागतात. मात्र त्यांचे व्याज दर बँकांपेक्षा जास्त असते.
जर तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी दोन्हीकडून जाणाऱ्या हफ्त्यांची तुलना केली तर तुम्हाला कळेल की, बँकेकडून गृहकर्ज घेणं जास्त सोयीस्कर आहे. एनबीएफसीमधून गृहकर्ज घेतलं तर कमी कागजपत्र द्यावी लागतात. मात्र त्यांचे व्याज दर बँकांपेक्षा जास्त असते.
क्रेडिट स्कोर महत्त्वाचा
सिबिल स्कोर चांगला असू दे- बँका गृहकर्ज देण्याआधी तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहते. जर एखादी बँक हे तपासून पाहत नसेल तर तुम्ही स्वतःहून बँकेला याबद्दल सांगणे आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नाहीये तर सर्वात आधी तो नीट करुन घ्या. थकलेली बिलं वेळेत भरून सिबिल स्कोर नीट केला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक फक्त तुम्हाला गृहकर्जच देत नाही तर व्याज दरही काही अंशी कमी करते.
कोणत्याही बँकेतन किंवा एनबीएफसीमधून गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्हाला वाटले की अधिक व्याज घेतले जात आहे तर तुम्ही दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करु शकता. पण एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज ट्रान्सफर करताना त्याची प्रोसेसिंग फी आणि व्याज दर याची योग्य चौकशी करा.
दिलेल्या वेळेआधीही फेडू शकता गृहकर्ज
गृहकर्ज घेतल्यानंतर जर तुमची मिळकत वाढली. तर तुम्ही गृहकर्ज लवकरात लवकर फेडू शकता. तुम्ही गृहकर्जच्या प्री- पेमेंट ऑप्शनवर जाऊन कर्ज फेडू शकता. गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला इनकम टॅक्समध्ये सूट मिळते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये बोनस किंवा एरियस मिळाले तर तुम्ही गृहकर्जाच्या अकाऊंटमध्ये ती रक्कम भरू शकता. यासाठी तुम्हाला बँकेला अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नाही.