रावेर-(प्रतिनिधी) – तालुक्यातील विवरे येथील श्री ग गो बेंडाळे प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे यांचा त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम राबविले त्यामध्ये शाळेतील नर्सरी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या ऑनलाइन क्लासेस शिक्षकांमार्फत घेण्यात येत आहे.
शालेय परिसरात वृक्षारोपण करणे, कोरोना काळात स्वतः घरी मास्क तयार करून गरीब व गरजू लोकांना मोफत वाटप केले, महिलांचा बचत गट तयार करून कष्टाळू व मेहनती महिलांना बँकेमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा , वकृत्वस्पर्धा ,महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम अशा विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाची दखल घेऊन त्यांना भारतीय राष्ट्रीय युवा परिषद तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यावेळी प्रा.श्री शैलेश राणे सर व विवरे येथील श्री.ग गो बेंडाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ए जी महाजन सर यांना सुद्धा भारतीय राष्ट्रीय युवा परिषद तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर शिक्षक संवर्धक संघाचे चेअरमन श्री प्रकाश मुजुमदार सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्री सुधाकर धर्मा चौधरी ,भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री गिरीश पाटील व कुमारी धनश्री ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले ,रावेर तालुका शहराध्यक्ष प्रणित महाजन हे व्यासपीठावर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य रतनलाल सी बाफना ज्वेलर्स चे लाभले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात तालुकाध्यक्ष राज मोहम्मद खाटिक, तालुका उपाध्यक्ष दीपक भुसे, तालुका सचिव गौरव महाजन ,हर्षा सरोदे , अक्षय महाजन, हर्षद पिंजारी, तालुका समन्वयक पियुष बऱ्हाटे, गौरव काठोळे यांनी परिश्रम घेतले .प्रास्ताविक कु धनश्री विवेक ठाकरे , सूत्रसंचालन राजेश पाटील , तर दीपेश भुसे यांनी आभार मानले. यावेळी श्री ग गो बेंडाळे प्राथमिक विद्यामंदिर विवरे येथील सर्व स्टाफ, व तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.