ठाणे – एका ६ वर्षाच्या भाचीवर नराधम ४२ वर्षीय मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासल्या गेली आहे.पीडित अल्पवयीन मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नराधम मामा विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
नराधम मामा हा शेजारीच राहत होता त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना पहिले असता त्याने त्याच्या आईला घटनेची माहिती दिल्यावर आईने पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला.
आरोपी अटकेत…
नराधम मामाला पोलिसांनी अटक केली आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.