गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी होऊन पावसाने राज्यभरात कहर केल्यानंतर मागील पाच – सहा दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असतांना (IMD) हवामान खात्याने काही जिल्ह्यांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून साधारण रविवार नंतर विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहेत.
राज्यात पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता खूपच कमी आहे. पण रविवार नंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचे कमबॅक होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0Sy8D1Ng4j— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2021