जळगाव, (प्रतिनिधी)- उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार करून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून यात सुदैवाने ते सुखरूप बचावले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
यावेळी हल्लेखोरांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळा येथील घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.दरम्यान कुलभूषण पाटील हे पोलीस स्थानकात दाखल झाले आहे.