चाळीसगाव(प्रतिनिधी)- समता सैनिक दल चाळीसगाव शाखेतर्फे , चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळ विश्र्व भुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती स्मारक झाले पाहिजे या मागणीचे निवेदन दलाचे राष्ट्रीय संघटक मा. धर्मभुषण बागुल यांचे नेतृत्वात चाळीसगाव न. पा.प्रशासन व नगराध्यक्षा सौ.आशाताई चव्हाण यांना आज दिनांक 19 जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनाच्या प्रती खासदार उन्मेष पाटील ,आमदार मंगेश चव्हाण व माजी आमदार राजीव देशमुख यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.उपस्थित सर्व बांधवांचे दलाच्या वतीने आभार. त्याप्रसंगी स्वप्नील जाधव तालुकाध्यक्ष,बाबा पगारे तालुका सचिव, यांच्यासह समता सैनिक दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

