दहावी आणि बारावी पास असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची १६ जुलै २०२१ आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
१) नाविक (जनरल ड्युटी-जीडी)/ Navik (General Duty-GD) २६०
२) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-डीबी)/ Navik (Domestic Branch-DB) ५०
३) यांत्रिक (मेकॅनिकल)/ Yantrik (Mechanical) २०
४) यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/ Yantrik (Electrical) १३
५) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)/ Yantrik (Electronics) ०७
शैक्षणिक पात्रता:
नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२१ आहे.
जाहिरात (Notification) : PDF