रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्यातील जिन्सी शिवारातील शेतात लागवड केलेल्या कपाशीसाठी ठिबक नळ्या टाकन्याचे काम सुरू असतांना अचानक हवामानात बद्लून पाऊस होवून व विजांच्या कडकडाट सुल झाला . त्यात वीज पडल्यांने जिन्सी येथील शेतमालकासह १० मजुरांना इजा होवून दोन जन बेशुद्ध पडले ही घटना ९ जुन रोजी घडली या नंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी जखमी ची भेट घेऊन विचारपूस केली .
तालुक्यातील जिन्सी गावापासून ४ किमी अंतरावरली लक्ष्मण मोरसिंग पवार यांच्या शेतात १० मजूर कपाशीसाठी ठिबक नळ्या अंथरत होते . दुपारी १ .३० वाजेच्या सुमारास हलका पाऊस सुरू होवून विजांचा कडकडाट सुरु झाला यावेळेस अचानक शेतात वीज पडली . या धक्याने जिन्सी येथील १० लोकांना इजा झाली आहे . बळीराम दल्लू पवार (वय २१ ) , दिलीप लक्ष्मण पवार ( २१ ) , अरविंद साईराम पवार ( १५ ), ईश्वर दल्लू पवार ( १ ५ ) , कमलसिंग लक्ष्मण पवार ( २० )अनिल लक्ष्मण पवार ( ५०) , साईराम मोरसिंग पवार ( ३७ ) , बिंदूबाई मोरसिंग पवार ( ५० ) , मलखान मोरसिंग पवार ( ४ ५ ) , लक्ष्मण मोरसिंग पवार ( ५५ ), अशी जखमींची नावे आहेत रावेर ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करूण सर्वांची तबेत चांगली असल्याने घरी पाठवल्याचे वैदीकीय अधिकाऱ्यांनी नजरकैद शी बोलतांना सांगितले .
आमच्या ७० फुटावर वीज पडली आम्ही कपाशीला ठिबक नळ्या टाकण्याचे काम करत होतो . यावेळी अचानक आमच्या पासून सुमारे ७० फुटाच्या अंतरावर खुल्या शेतात वीज पडली . यामुळे आम्ही सर्व इकडेतेकडे फेकल्या गोलो . दिलीप लक्ष्मण पवार व मी असे आम्ही दोघे बेशुद्ध झालो सुदैवाने या आपत्तीतून बचावलो तो प्रसंग आविश्यातील खूपच भितीदायक होता.-
बळीराम पवार , -जखमी जिन्सी रावेर