रावेर-प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- मुक्ताईनगर मतदारसंघातील (रावेर विभाग)तालुक्यातील निंभोरासिम,विटवा,निंबोल ऐनपूर,सुलवाडी, कोळदा,धामोडी,वाघाडी,रेभोटा, शिंगाडी, कांडवेल या भागात गुरुवारी दिनांक 27 मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील 12 पेक्षा जास्त गावांना जोरदार तडाखा दिला.या वादळामुळे अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाली.ठिकठिकाणी झाडे तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.कापणीला आलेल्या केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले.त्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांनी केळीच्या नुकसानग्रस्त शेती शिवारात भेट दिली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आमच्या काळात आम्ही नुकसान ग्रस्त भागात सरसकट 50 टक्के अर्थसाह्य ,मदत देत होतो परंतु आताच्या महा विकासआघाडी सरकारने ते ही बंद केले आहे. पिक विमा योजने संदर्भात कंपन्या आजही त्याच आहेत फक्त राज्य सरकारने त्यांच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
केंद्रशासन त्यासाठी पैसा पुरवीत आहे परंतु राज्य शासनाचे काम आहे केळी पीक विमा योजनेचे निकष ठरवणे, टेंडर काढणे, राज्य सरकारने टेंडर उशिरा काढल्यामुळे लोकांनी उशिरा पैसे भरले त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत.असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी मांडले.पत्रकार यांनी वार्तालाप करतांना देवेंद्र फडवणीस यांना मागील एक वर्षापूर्वी त्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्प याबद्दल आश्वासन दिले होते त्यांची आठवण त्यांना करून दिली त्यावर त्यांनी सांगितले मेगा रिचार्ज प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याचा डी पी आर तयार होत आहे येत्या दोन ते तीन महिन्यात हा डीपीआर तयार होईल आणि लवकरच मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल.
माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची आठवण याठिकाणी देवेंद्र फडवणीस यांना झाली 2019 मध्ये जेव्हा याच पद्धतीने चक्रीवादळ आले होते तेव्हा आम्ही हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीने जे काही निकष दिले होते त्यात आम्ही पिक विमा योजना घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करत होतो व ज्यांनी पिक विमा योजना घेतला नाही त्यांना सुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य करत होतो आताच्या सरकारने पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार? यावर देवेंद्र फडवणीस त्यांनी सांगितले आमच्या काळात आम्ही साडेतीन हजार रुपये हेक्टरी मदत केलेली होती आता संपूर्ण पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल व सरकारकडे आम्ही जास्तीत जास्त हेक्टरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.धामोडी,कोळदा,सुलवाडी येथे नुकसान ग्रस्त घरांचे पाहणी करतांना ज्यांच्या घराचे नुकसान झाले होते त्या महिलांनी रडत-रडत आपली कैफियत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली एक वृद्ध महिलेने सांगितले आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले म्हणजेच अनेक दौरे झाले ( मागील चार ते पाच दिवसात) परंतु कोणी काहीच मदत केली नाही.फक्त सर्वांनी आश्वासने दिली.अशी व्यथा त्यांनी मांडली.
सर्व पाहणी दौरा आटोपल्यानंतर तांदलवाडी येथे देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी बाबत तक्रार केलेली आहेत तिथे अजूनही नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी आलेच नाहीत त्यामुळे आपण विमा कंपन्यांसोबत बोलणार आहोत नुकसान 100 टक्के आहे.परंतु विमा कंपन्या हे 60 टक्के दाखवत आहे महसूल यंत्रणेने जर 100 टक्के नुकसान दाखवले असेल त्यानुसार पंचनामे झाले पाहिजे किमान ऐंशी टक्के तरी मदत ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. सरकार हेक्टरी रु.6000 ते रु. 8000 मदत करणार आहे.परंतु एवढ्यावर शेतकऱ्यांचे भागणार नाही नुकसान खूप मोठे आहे.त्यासाठी आम्ही शासनाकडे जास्तीत जास्त मदतीसाठी पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत जामनेरचे आ. गिरीश महाजन, रावेरच्या खा. रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना ताई पाटील, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार संजय सावकारे मा.आ.स्मिताताई वाघ, मा.वि.सदस्य चंदु पटेल, जि.प.सदस्य नंदू महाजन,माजी कृषी उत्पन्न सभापती श्रीकांत पाटील,मोरगाव चे प्रल्हाद पाटील पंचायत समिती सभापती कविताताई कोळी, तहसीलदार उषाताई देवगुणे,बीडीओ-दिपाली कोतवाल , कृषि अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, तसेच रावेर तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र लासूरकर, महेंद्र पाटील ,हरलाल कोळी,सदिप सावळे,रत्नाकर महाजन, शुभम पाटील, अमोल महाजन, अतुल पाटील यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.