पाचोरा,(प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ अखेर नियुक्त करण्यात आले असून माजी आमदार दिलीप वाघ मुख्य प्रशासक तर जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकूण ०७ जणांची प्रशासक नियुक्त
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळगाव जिल्हा अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्ती करणे बाबत पत्र प्राप्त झाले असून यामध्ये १ मुख्य प्रशासक तर ६ प्रशासकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी चे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तर शिवसेनेचे अभय पाटील,शिवाजी दौलत पाटील,युवराज रामसिंग पाटील,चंद्रकांत धनवडे,रणजित पाटील व जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची प्रशासक म्हणून निवड करणे बाबत अशासकीय प्रशासकीय मंडळात समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली असून वरील सर्व व्यक्ती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर नियुक्ती करण्यास पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव वळवी यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे.