यावल (दिपक नेवे)- शहर आणी यावल रावेर तालुक्यातील व परिसरातील सर्व रिक्षा चालक बांधवांसाठी महत्त्वाचे सूचना कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थीक अडचणीत आलेल्या राज्यातील रिक्षा चालकांकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ७ लाख पाच हजार रिक्शा चालकांसाठी १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असुन , यासाठी निशुल्क रिक्शा चालकांच्या नांव नोंदणीसाठी यावल नगर परिषदचे युवा नगरसेवक डॉ कुंदन सुधाकर फेगडे यांनी यावल येथे नांव नोंदणीसाठी ऑनलाइन कक्ष उभारणी केली आहे .
या कोविड-19 च्या लॉकडाऊन मूळे आर्थिक संकटात सापडलेल्या परवाना धारक सर्वसामान्य रिक्षा चालकांना १५००/- रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान रुपाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून देण्यासाठी जनसेवक यावल-रावेर डॉ कुंदन फेगडे यांच्या तर्फे निशुल्क सेवा कक्ष दि २६ मे २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे तरी दोघ यावल आणी रावेर या दोघतालुक्यातील रिक्शा चालकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
यावल भुयावळ मार्गावरील भुसावळ टीपौईंट जवळ असलेल्या आई हॉस्पिटल च्या बाजूला श्री कलेक्शन च्या खाली उभारण्यात आलेल्या नांव नोंदणी कक्षात तात्काळ आपल्या नांवाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी , पुढील माहीती साठी डॉ . कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार मो. ७६२०७२१७९९ , उज्वल कानडे मो .क्रमांक९१५८३२५१४३ आणी रितेष बारी मोबाईल क्रमांक७४९९४१९४९६ यांच्याशी संपर्क साधुन या अनुदानाविषयी अधिक माहीती जाणुन घ्यावी व आपल्या नांवाची तात्काळ नोंदणी करून घ्यावी व महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांनी यावल आणी रावेरच्या रिक्शाचालकांसाठी केले आहे.