सिंधुदूर्ग, (प्रतिनिधी) – मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी ताशेऱे ओढत सरकारने परीक्षा रद्द करून शिक्षणाची थट्टा चालवली असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.तर न्यायालयाने सरकारला दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये असा प्रश्न विचारला असून या बाबत दोन – तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधी सोबत सांगितले आहे.
दहावी, बारावी परीक्षा बाबत न्यायालयाने तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलतांना सांगितलं आहे कि,दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार आहे.