मुंबई,- वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन (WHO), IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या ‘ Coronil ‘ औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नसल्याचं राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून केलं आहे.
ना. देशमुख यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,पतंजलीच्या Coronil औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.असंही त्यांनी म्हटलं आहे.

