मुंबई- आज सकाळी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला असून त्यांच्या अनेक चाहत्यांनी ऋषीं कपूर यांनी अखेरचा निरोप घेतला यावर विश्वास बसत नसल्याचे ट्विट केले आहे.त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्कादायक देणारी बातमी आहे.
ऋषीं कपूर यांची काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान खान यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.चाहत्यांनाही ऋषीं यांच्या निधनाने धक्का बसला आहे.