जळगाव,(प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या नशिराबाद हायवेला ओरिएंट सिमेंट कारखाना प्रशासना कडून परवानगी काढून सुरु आहे या कारखान्यात कामगार व ट्रान्सपोर्ट साठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे इथं कोरोना संक्रमणाचा धोका आहे म्हणून सदर कारखाना तात्पुरता बंद करण्यात यावा असे पत्र मनसेचे तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कंपनीत राज्या बाहेरील व नशिराबाद परिसरातील अनेक कामगार काम करत असून सिमेंट ट्रान्सपोर्ट करिता शेकडो वाहने रोज ये-जा करत असल्याने या ठिकाणी कोरोना संक्रमनाचा धोका वाढतोय म्हणून सदर कारखाना बंद करण्यात यावा असे पत्र मनसेचे तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे असे प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.